आकांक्षा पतीसोबत मालदीवच्या सुट्टीवर; लवकरच दिसणार अजय देवगणच्या चित्रपटात

Balkrishna Madhale

कन्नड चित्रपट 'पैलवान'मधून दक्षिण चित्रपटांमध्ये पदार्पण करणारी टीव्ही अभिनेत्री आकांक्षा सिंह सध्या मालदीवमध्ये पती कुणाल सेनसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे.

आकांक्षानं तिच्या व्हेकेशनचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर नुकतेच शेअर केले आहेत.

आकांक्षाचे बिकिनीतील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या छोट्या ट्रिपचा सुंदर प्रवास शेअर करण्यासाठी आकांक्षानं इंस्टाग्रामची निवड केलीय.

सतत शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या आकांक्षानं बऱ्याच दिवसांनी सुट्टीतून ब्रेक घेतलाय.

या फोटोत हे कपल एकमेकांना किस करताना दिसत आहे.

आकांक्षा लवकरच अजय देवगणसोबत Mayday मध्ये दिसणार आहे.

ती अजयच्या पत्नीची भूमिका साकारणार असून, या चित्रपटात बिग बी आणि रकुलप्रीत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Akanksha Singh