दररोज नाश्त्यात तेच पदार्थ खाल्ल्याने कंटाळा येऊ शकतो, त्यावेळी तुम्ही असे काही वेगळे पदार्थ ट्राय करु शकता. यांपैकी एका पदार्थांची सोपी रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणारा आहोत. हा पदार्था आहे पोहा-कोबी पराठे..
सुरुवातील एक वाटी पोहे भिजवून त्यात कोबीज खिसून घ्या. त्यात दोन हिरव्या मिरच्या, आलं, लसून आणि जिरे याची पेस्ट करुन टाका.
भिजलेले पोहे मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचे. आणि त्यात किसलेला कोबी आणि ही पेस्ट एकत्र करून घ्या.
यानंतर यात गरम मसाला, हळद पावडर, लाल तिखट, जीरे-धने पावडर आणि चिरेलील कोथिंबीर घालावे.
या मिश्रणा मीठ न चुकता चार ते पाच चमचे ज्वारीचे पीठ घालून लागले तसे पाणी घालून हलकसं पातळ पीठ करुन घ्या.
तव्यावर तेल किंवा तूप घेऊन याची पातळ पोळी करुन मंद गॅसवर ब्राऊन रंग येइपर्यंत भाजायची. परतवून परत हीच प्रक्रिया करा.
झटपट होणारी ही नाश्ताची डिश तुम्ही सॉस किंवा पुदीन्याच्या चटणी सोबत सर्व्ह करु शकता.