पाहा, देशमुखांची सून जेनेलिया डिसूझाचा सक्‍सेसफुल फिल्मी करिअर!

| Sakal

जेनेलिया डिसूझाचा जन्म मुंबईत झाला, मात्र तिचे टॉलिवूडमधील तमिळ, कन्नड व तेलुगु चित्रपट सर्वांत सुपरहिट ठरले.

| Sakal

साउथ फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

| Sakal

2003 मध्ये 'तुझे मेरी कसम' या रितेश देशमुख नायक असलेल्या चित्रपटातून जेनेलियाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली.

| Sakal

त्यानंतर जेनेलियाने मस्ती, फोर्स, तेरे नाल लव्ह हो गया अशा अनेक हिंदी चित्रपटांमधूनही प्रमुख भूमिका साकारल्या.

| Sakal

'तुझे मेरी कसम' या चित्रपटापासूनच जेनेलिया व रितेशमध्ये प्रेमाचे अंकुर फुटले.

| Sakal

फेब्रुवारी 2012 मध्ये रितेश व जेनेलिया विवाहबंधनात अडकले.

| Sakal

2007 मध्ये तमिळ चित्रपट 'संतोष सुब्रह्मण्यम'मध्ये साकारलेल्या हासिनी या पात्राबद्दल जेनेलियाला तमिळ चित्रपटसृष्टीचा सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला.

| Sakal

त्यानंतर रितेशचा होम प्रॉडक्‍शन चित्रपट असलेला 'लई भारी'पासून जेनेलियाने चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला.

| Sakal

तत्पूर्वी जेनेलियाने तेलुगु खेरीज तमिळ, कन्नड व हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. ती साउथ इंडियन चित्रपटसृष्टीत आघाडीची नायिका म्हणून गणली गेली.

| Sakal