Parenting Tips: मुलांची भूक वाढवण्याचे उपाय

| Sakal

मुलांना वेळेत जेवण करायला लावणं, खूपच कठीण काम असतं. कारण मुलं खाण्याच्या बाबतीत नेहमीच टाळाटाळ करत असतात.

| Sakal

लहान मुलांनी कमी खाणं किंवा त्यांना भूकच न लागणं यामुळे पालक चिंतेत असतात.

| Sakal

जर तुमच्या मुलाला सुद्धा भूक लागत नसेल तर तुम्ही काही सोपे परंतु परिणामकारक उपाय करू शकता.

| Sakal

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, मुलांचं आरोग्य तेव्हाच राखलं जाईल, जेव्हा त्यांना भूक चांगली लागेल. मुलांना भूक लागली नसताना त्यांना जबरदस्तीने खायला लावल्यामुळे ते उलटी करू शकतात.

| Sakal

लहान मुलांना जेवढी भूक लागेल, तेवढेच त्यांचं आरोग्यही चांगलं राहील.

| Sakal

लहान मुलांना जंक फूड खायला फार आवडतं. परंतु त्याचा वाईट परिणाम त्यांची भूक आणि आरोग्य यांवर होतो.

| Sakal

मुलांना भूक लागण्यासाठी त्यांनी अॅक्टिव्ह राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांनी व्यायाम, पोहणं, खेळणं किंवा इतर शारीरिक हालचाल करणं महत्त्वाचं आहे.

| Sakal

लहान मुलांना जेवताना कमीत कमी प्यायला द्या. जास्त पाणी प्यायलामुळे त्यांचं जेवण नीट जात नाही.

| Sakal

अनेक लहान मुलांना भाज्या आणि डाळी खायला आवडत नाहीत, परंतु त्यांना पराठे, पोळी यांच्यासोबत या गोष्टीही खायला द्या.

| Sakal