शहाळे आणि त्वचेच्या आरोग्याचा असा आहे संबंध

| Sakal

उन्हाळ्यात घसा कोरडा पडल्यानंतर शहाळ्याचे पाणी प्यायले जाते. त्यासोबत त्याची मलाई खाण्यातही वेगळा आनंद असतो. शहाळ्याचा उपयोग केवळ खाण्यासाठीच नाही तर त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठीही केला जातो. चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी शहाळ्याचे पाणी आणि मलई उपयुक्त आहे.

| Sakal

त्वचेतील ओलावा टिकून राहील

शहाळ्याचे पाणी आणि मलई त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते. यात अ आणि क जीवनसत्त्वे, प्रथिने, कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह, सोडियम आणि मॅग्नेशिअम असते. काही आठवडे वापर केल्यानंतर फरक जाणवेल.

| Sakal

मलाईने करा मालिश

सकाळी किंवा रात्री झोपण्याआधी मलाईने चेहऱ्याला मालिश करा. दहा मिनिटे तसेच ठेवून कोमट पाण्याने चेहरा धुवा. हे काम तुम्ही सकाळी करणार असाल तर मलाईला थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्याची सूज कमी होईल व चेहरा प्रसन्न दिसेल.

| Sakal

चेहऱ्याचा तेलकटपणा घालवा

मलई, मुल्तानी माती, गुलाब पाणी व बेसन यांचे मिश्रण करा. हे मिश्रण चेहऱ्यावर २० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर मऊ फडक्याने पुसल्यास स्वच्छ त्वचा दिसेल.

| Sakal

करपलेल्या त्वचेपासून मुक्ती

मलाई किसून घ्या व त्यात कॅरेट सीड एसेन्शिअल ऑईलचा एक थेंब टाका. हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवा. बर्फ तयार झाल्यानंतर त्याने चेहऱ्याला मालिश करा. थोडावेळ तसेच ठेवून चेहरा स्वच्छ करा.

| Sakal

स्क्रबप्रमाणे उपयोग

मलाई आणि ओट्स यांचे मिश्रण केल्यास स्क्रब तयार होईल. या स्क्रबने शरीराला मालिश करा आणि मग आंघोळ करा.

| Sakal