सरत्या वर्षात क्रिकेट जगतात अनेक घडामोडी घडल्या. अनेक रेकॉर्ड झाले, वाद उद्भवले, नव्या खेळाडूंनी पदार्पण केले.
काही खेळाडूंनी क्रिकेटला अलविदा म्हटले. आपण 2021 मध्ये कोणी कोणी क्रिकेटला अलविदा केले याचा मागोवा घेणार आहोत.
2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार्यांमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
धडाकेबाज फलंदाज युसूफ पठाणने निवृत्ती जाहीर केली. युसूफने 57 एकदिवसीय आणि 22 T-20 सामने खेळले आहेत. आणि 2007 मध्ये T-20 विश्वचषक आणि 2011 WC जिंकलेल्या भारतीय संघाचा सदस्य आहे.
दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने यावर्षी क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. एबीने दक्षिण आफ्रिकेसाठी 114 कसोटी, 228 एकदिवसीय आणि 78 T-20 सामने खेळले आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेननेही यावर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. त्याने कसोटीत 439, एकदिवसीयमध्ये 196 तर टी 20 मध्ये 64 विकेट्स घेतल्या.
श्रीलंकेचा अनुभवी सलामीवीर उपुल थरंगाने यावर्षी फेब्रुवारीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
भारतीय खेळाडू विनय कुमार, वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो आणि अफगाणिस्तानचा फलंदाज असगर अफगाण यांनीही यावर्षी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने 103 कसोटीत 417 विकेट्स, 236 एकदिवसीय सामन्यांमध्ये 269 विकेट आणि 28 T-20 मध्ये 25 विकेट घेतल्या आहेत.