पायात साधी स्लीपर, संथाली साडी घालून द्रौपदी मुर्मूंनी घेतली शपथ

धनश्री ओतारी

द्रौपदी मुर्मू यांनी आज २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.

द्रौपदी मुर्मू या देशातील पहिल्या आदिवासी राष्ट्रपती ठरल्या आहेत.

देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झालेल्या मुर्मू अतिशय साधेपणाने शपथविधीसाठी आल्या होत्या. त्यांचा हा साधेपणा अनेकांचा भावला.

संथाली साडी, पांढऱ्या रंगाची स्लीपर घालून त्यांनी १५व्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.

संथाली समाजातील स्त्रिया विशेष प्रसंगी ही संथाली साडी नेसतात. द्रौपदी मुर्मू यांनीही शपथ घेताना हीच साडी नेसली आहे.

द्रौपदी मुर्मू या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती बनल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.