उन्हाळ्यात चेहऱ्याची त्वचा कोरडी पडतेय ? हे उपाय नक्की करा...

नमिता धुरी

उन्हाळ्यात पाण्याची कमतरता आणि अति ऊन यांमुळे चेहऱ्याची त्वचा कोरडी पडते. त्वचेचा कोरडेपणा घालवण्यासाठी काही खास उपाय....

ई जीवनसत्त्व

ई जीवसत्त्वामध्ये असलेले अॅण्टिऑक्सिडंट कोरड्या त्वचेपासून मुक्ती देतात.

नारळाचे तेल

नारळाच्या तेलात पोषक चरबीयुक्त आम्ल असल्याने त्वचा मऊ राहाते.

अॅलोवेरा जेल

अॅलोवेरा जेलमध्ये असलेले दाहविरोधी गुण त्वचेचा मऊपणा कायम ठेवतात.

जोजोबा तेल

जोजोबा तेलाचा वापर बऱ्याचशा सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. या तेलामुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते.

ग्लिसरीन

ग्लिसरीनमध्ये क्लिंजींग गुण असतात. कोरडी त्वचा व्यवस्थित करण्यास ग्लिसरीन मदत करते.

बदामाचे तेल

बदामाच्या तेलात लिनोलिक आम्ल नामक प्राकृतिक मॉइस्चरायजिंग घटक असतो. यामुळे त्वचा मऊ वा आरोग्यदायी बनते.

ऑलिव्ह तेल

या तेलात मॉइस्चरायजिंग गुण असतात. यामुळे कोरड्या त्वचेमुळे येणारी खाज नाहीशी होते.

मुल्तानी माती

मुल्तानी माती चेहऱ्याला लावल्याने त्वचेची खोलवर स्वच्छता केली जाते. यामुळे रक्ताभिसरण चांगले होते व त्वचेला चमक येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.