Earth Day 2022: जाणून घ्या पृथ्वीवरील सर्वात चमत्कारिक ठिकाणे

सकाळ डिजिटल टीम

1) सॅन लुईस व्हॅली

अमेरिकेतील कोलारॅडो राज्यात हे ठिकाण आहे. या भागात सातत्याने अनोख्या आकृत्या दिसून येतात. तसेच जनावरांना मारले जाते तर काहीचे अवयव गायब असतात पण कधीच इथे रक्त सांडलेले दिसत नाही.

2) बर्म्युडा ट्रँगल

ब्राझील किनारपट्टीपासून सुमारे 300 किलोमीटर लांब अंतरावर अया भागात मोठ्या संख्येने विमाने व जहाजे गायब झाली आहेत. रेडिएशनच्या विसंगतीने असे होते, असे मत शास्त्रज्ञांचे आहे.

३) बेनिनिंगटन ट्रँगल

हे ठिकाण अमेरिकेतील असून या भागात नेहमीच मोठे पाय असलेल्या मानवी आकृत्या दिसून येतात. तसेच विचित्र आवाजसह प्रखर प्रकाशही दिसून येतो. अमेरिकन या भागाला शापित भाग म्हणून ओळखतात.

4) मिशिगन ट्रँगल

हे ठिकाण अमेरिकेतील पाच मोठ्या सरोवरांपैकी एक आहे. या सरोवरात आतापर्यांत 40 विमाने गायब झाली आहेत ही विमाने कशी गायब झाली, हे गूढ अद्यापही कायम आहे

5) एंगिकुनी लेक

हे ठिकाण कॅनडातील कैजान नदीनजीक आहे.1930 मध्ये या सरोवराच्या किनारी वसलेल्या गावातील सुमारे 2 हजारांहून अधिक लोक अचानक गायब झाले. त्यांचा अद्यापही थांगपत्ता लागू शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.