गुरुच्या चंद्रावर जीवसृष्टीची शक्यता

नमिता धुरी

युरोपा आपल्या बर्फाळ पृष्ठभागाखाली प्राणवायू शोषून घेत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे येथे जीवसृष्टी असण्याची शक्यता बळावली आहे. या समुद्रातील जीवसृष्टीचा विषय वादातीत आहे.

नासा जोपर्यंत तेथे Europa Clipper पाठवत नाही तोपर्यंत हा वाद सुरूच राहणार आहे. शास्त्रज्ञ युरोपाच्या विविध पैलूंचा अभ्यास करत आहेत. पृथ्वीवरील महासागरांच्या तुलनेत अधिक पाणी युरोपावर आहे.

सूर्याचा प्रकाश आणि गुरूचे ऊर्जाकण युरोपावर आदळतात तेव्हा प्राणवायूची निर्मिती होते. विस्तीर्ण पसरलेले बर्फाचे आच्छादन समुद्र आणि प्राणवायूच्या यांच्यात अडथळा आणते. बर्फाखालील क्षारयुक्त पाण्याचे पूल पृष्ठभागापासून समुद्रापर्यंत प्राणवायू वाहून नेतात. कनवेक्शन करंटमुळे जेथे बर्फ विरघळतो तेथे हे पूल असतात.

बर्फाचे आच्छादन १५ ते २५ किमी जाड असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

हा शोधनिबंध 'जियोफिजिकल रिसर्च लेटर्स जर्नल'मध्ये प्रकाशित झाला आहे. 'यूटी जॅक्सन स्कूल ऑफ जिओसाइंसेस डिपार्टमेंट ऑफ जिओलॉजिकल सायन्सेस'चे प्राध्यापक मार्क हेस्से यांनी हा शोधनिबंध लिहिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.