Picnic Spots : उन्हाळ्यात महाराष्ट्रातील या पाच ठिकाणी नक्की भेट द्या

सकाळ डिजिटल टीम

महाबळेश्वर - उन्हाळ्यात महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण उत्तम पिकनिक स्पॉट आहे. महाबळेश्वरमध्ये प्रतापगड, मॅप्रो गार्डन, वाई, महाबळेश्वर बाजार, स्ट्रॉबेरी फार्म ही ठिकाण पाहण्यासारखी आहेत.

लोणावळा - उन्हाळ्यात दोन तीन दिवसाच्या टूरसाठी लोणावळा उत्तम पर्याय आहे. हिल स्टेशन असलेला लोणावळा येथील सनसेट पॉईंट, वॅक्स म्युझिअम, भुशी डॅम अशी काही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत.

माथेरान - मुंबईपासून अगदी जवळ असलेलं पर्यटनाचं ठिकाणं म्हणजे ‘माथेरान’. दोन तीन दिवसाच्या टूर साठी माथेरान उत्तम पर्याय आहे.

चिखलदरा - चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील सुमारे १११८ मीटर उंचीवरचे ठिकाण आहे. निसर्गाच्या सानिध्यात रम्य वातावरणात असलेल्या चिखलदऱ्याला विदर्भाचे नंदनवन समजले जाते.

आंबोली - आंबोली येथे महादेवगड पॉईंट, मलईचे जंगल, सनसेट पॉईंट, शिरगावकर – परीक्षित पॉईंट्स, कावळे प्रसादचा कडा, नारायण गड, महादेव गड, नांगरकासा धबधबा अशी अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.