साउथमध्ये फ्लॉप, बॉलिवूडमध्ये हिट! Hot दिशा पटानीची गाडी रुळावर

श्रीनिवास दुध्याल

तुम्हाला माहीत का, की उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये जन्म झालेल्या दिशा पटानीचा पहिला चित्रपट साउथ इंडियन होता!

दिशा पटानी | esakal

राजपूत पार्श्वभूमी असलेल्या घरात तिचा जन्म झाला असून, तिचे वडील जगदीशसिंग पटानी हे पोलिस अधिकारी आहेत, तिची आई आरोग्य निरीक्षक आहे तर तिची मोठी बहीण खुशबू पटानी भारतीय सैन्यात लेफ्टनंट आहे.

दिशा पटानी | esakal

दिशाचे इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण झाले असून, ती पॉंड्‌स फेमिना मिस इंडिया इंदूर 2013 ची फर्स्ट रनर अप होती.

दिशा पटानी | esakal

दिशाने 2015 मध्ये वरुण तेज सोबत 'लोफर' या तेलुगु चित्रपटाद्वारे साउथ इंडियन चित्रपटात पदार्पण केले, मात्र हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सपाटून मार खाल्ला.

दिशा पटानी | esakal

2016 मध्ये टायगर श्रॉफसोबत 'बेफिक्रा' या संगीत व्हिडिओमध्ये दिशा दिसली, ज्याची निर्मिती भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी केली होती.

दिशा पटानी | esakal

त्यानंतर तिने 2016 मध्ये 'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी'मधून बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केले. या चित्रपटात सुशांतसिंग राजपूतसोबत दिशाला व्यावसायिक ब्रेक मिळाला.

दिशा पटानी | esakal

दिग्दर्शक नीरज पांडे आणि फॉक्‍स स्टार स्टुडिओ निर्मित 'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला आणि 216 कोटींच्या कलेक्‍शनसह प्रचंड हिट ठरला.

दिशा पटानी | esakal

त्यानंतर दिशाने टायगर श्रॉफसोबत 'बागी 2'मध्ये काम केले. जून 2019 मध्ये ती सलमान खानच्या 'भारत'मध्ये दिसली. 2020 मध्ये तिने सलमान खानसोबत 'राधे' या ऍक्‍शन चित्रपटातही काम केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिशा पटानी | esakal