गौरी कुलकर्णी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
गौरी खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस असून इन्स्टाग्रामवर ती तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
गौरीने नुकताच फोटोशूट केला असून ती त्यात खूप सुंदर दिसतेय.
गौरी उत्तम नृत्यांगनादेखील आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये तिने स्टेज परफॉर्मेन्स करुन आपल्यातील नृत्याची झलक दाखवली आहे.
2017 साली आलेल्या 'रंजन' चित्रपटातून गौरीने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
गौरी कुलकर्णीला वाचनाची आवड आहे. मालिकेच्या सेटवर गौरी जवळ नेहमीच एखादे पुस्तक असते.