कोलकाता येथील एका समलिंगी जोडप्याने रविवारी, 3 जुलै रोजी एका समारंभात लग्न गाठ बांधली.
अभिषेक रे आणि चैतन्य शर्मा यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या लग्न समारंभात अभिषेकने पारंपारिक बंगाली नवरदेवाची वेशभूषा निवडली तर चैतन्यने शेरवानी घातली होती.
त्यांच्या लग्न समारंभाला जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
या जोडप्याच्या हळदी आणि लग्न समारंभातील फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत.
या लग्न सोहळ्याचे अनेक फोटो चैतन्यने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केले आहेत.
दोघे एकमेकांना ओळखत होते, पण आता त्यांच्या नात्याचे अधिकृत लग्नबंधनात रुपांतर झालं आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हैदराबादमध्ये एका समलिंगी जोडप्याने लग्नगाठ बांधली होती. भारताने २०१८ मध्ये समलिंगी गुन्हा असलेला कायदा रद्द केला आहे.