चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी चेहऱ्यावर पानांपासून तयार केलेले फेसपॅक लावणे आवश्यक आहे.
पुदिना
पुदिन्याची पाने ठेचून त्यात काकडीचा रस घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण नैसर्गिक ओलावा देईल.
तुळस
तुळशीची पाने ठेचून त्यात लिंबूचा रस घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास डाग निघून जातील.
कडूनिंब
कडूनिंबाच्या पानांचा ठेचा करून त्यात मुल्तानी माती व गुलाबपाणी घाला. हे मिश्रण लावल्यास चेहऱ्यावरचा तेलकटपणा दूर होईल.
कडीपत्ता
कडीपत्त्याचा ठेचा करून चेहऱ्यावर लावल्यास चमक येईल.
मेथी
मेथीच्या पानांचा ठेचा करून त्यात मध घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास मुरुमांचे डाग निघून जातील.
लिंबूची पाने
लिंबूच्या पानांचा चुरा करून त्यात मुल्तानी माती व मध घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मऊ आणि चमकदार होईल.
पेरूची पाने
पेरूची पाने ठेचून नियमितपणे लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पुरळ नाहीसा होईल.