भोजपुरी सिनेसृष्टीतील (Bhojpuri Star) लोकप्रिय स्टार मोनालिसा (Monalisa) सध्या टीव्ही रिअॅलिटी शोवर (TV Reality Show) लक्ष केंद्रित करत आहे. मोनालिसा आणि विक्रांतला स्टार प्लस शोमध्ये चांगलीच पसंती मिळाली होती.
मोनालिसा ही मनोरंजन क्षेत्रातील काही प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. म्हणूनच, ती कधी तिच्या ग्लॅमरस स्टाईलनं (Glamorous Style) धुमाकूळ घालते, तर कधी साधेपणानं चाहत्याचं मन जिंकते. त्याचप्रमाणे मोनालिसानं पुन्हा एकदा तिच्या देसी लूकनं चाहत्याचं मन जिंकलंय.
लेटेस्ट फोटोंमध्ये मोनालिसा पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. पिवळ्या रंगाच्या प्रिंटेड सूटवर हिरव्या बांगड्या, बिंदी आणि कानातली रिंग तिच्या सौंदर्यात भर घालताना दिसत आहे.
विशेष म्हणजे, मोनालिसानं कॉटन सूटवर कोणत्याही प्रकारचा मेकअप केलेला नाहीय. तरीही ती खूप क्यूट दिसत आहे.
नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटताना मोनालिसा वेगवेगळ्या पोझही देताना दिसून आलीय.
पिवळ्या सूटमधील मोनालिसाचा साधेपणा सर्वांनाच आवडलाय. प्रत्येकजण कमेंटमध्ये मोनालिसाचं कौतुक करताना दिसत आहे.