Paneer Benefits : 'पनीर'पासून फायदा हवाय, मग 'असं' करा सेवन

| Sakal

पनीर तेलात तळण्याऐवजी सलाडमध्ये मिसळून खावू शकता. शिवाय, कच्चं पनीर खाणं आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. चवीसाठी तुम्ही वर चाट मसाला आणि काळी मिरी देखील वापरु शकता.

| Sakal

पनीर करीचा सर्वात आरोग्यदायी आणि सोपा पर्याय म्हणजे, पालक पनीर व पनीर भुर्जी. याशिवाय पनीर खीर, पनीर टोस्ट आदी पदार्थही करता येतात. बाजारापेक्षा घरी पनीर बनवणं आरोग्यदायी ठरतं.

| Sakal

पनीर जास्त काळ साठवून ठेवू नका. पनीर नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावं. त्यानंतर दोन ते तीन दिवसांत त्याचा वापरा करावा.

| Sakal

पनीर खाल्ल्याने आपले स्नायू मजबूत होतात. यामध्ये प्रथिनांचं प्रमाण चांगलं असतं. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, पनीर खाल्ल्यानं वजनही कमी होतं.

| Sakal

पनीर जास्त वेळ तेलात तळून, त्यात खूप मिरची-मसाला मिसळून ग्रेव्ही टाकल्यानं फारसा फायदा होत नाही, त्यामुळं पनीर कच्चंच खावं.

| Sakal