घरबसल्या या सोप्या पद्धतीने बनवा हेल्दी आणि केमिकल फ्री चवनप्राश

सकाळ डिजिटल टीम

चावनप्राश आयुर्वेदिक हेल्थटॉनिक आहे. हे इम्युनिटी वाढवण्याबरोबर आपल्याला एनर्जेटिक आणि हेल्दी बनवण्यासाठी मदत करते.

साध्या सर्दी खोकल्यापासून श्वास घेण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी एक्सपर्ट चवनप्राश खाण्याचा सल्ला देतात. आपण बघूया सोप्या पद्धतीने चवनप्राश बनवण्याची होममेड रेसिपी.

घरच्याघरी चवनप्राश बनवण्यासाठी सगळ्यात आधी आवळे स्वच्छ धुवून कपड्यात बांधून ठेवा

एका मोठ्या पातेल्यात पाणी भरून ते हाय फ्लेमवर ठेवा. यात सगळी औषधी वनस्पती आणि कपड्यात बांधून ठेवलेले आवळे टाकून उकळत ठेवा. आवळे नरम झाल्यानंतर गॅस बंद करा.

त्यांनतर आवळे आणि औषधी वनस्पती तशीच पातील्यात रात्रभर झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी आवळ्याचा रंग बदललेला पाहायला मिळेल. आता आवळ्यातल्या बिया काढून टाका.

आता मिक्सरमध्ये आवळा आणि औषधी वनस्पती थोडं पाणी टाकून बारीक करून घ्या, आणि नंतर ते चाळणीने चालून घ्या, जेणेकरून जाडसर पेस्ट राहणार नाही.

यांनतर गॅसवर एका लोखंडाच्या कढईत तिळाचं तेल टाकून गरम करायला ठेवा. लक्षात ठेवा कढई ही लोखंडाचीच हवी स्टीलच्या काढायचा वापर करू नका. तेल गरम होताच यात तूप टाकून गरम करायला ठेवून द्या. आता यात आवळ्याची पेस्ट टाकून शिजवून घ्या.

आता याला उकळी आल्यावर साखर टाकून घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. हे मिश्रण घट्ट झाल्यांनतर गॅस बंद करा आणि ४ ते ५ तासांसपर्यंत ते मिश्रण झाकून ठेवा.

आता मिक्सरमध्ये इलायची सोलून, त्यात पिंपळी, वंशलोचन, दालचिनी, नागकेशर, तमालपत्र वाटून घ्या. ही पेस्ट मध आणि केशरमध्ये मिसळून आवळ्याच्या मिश्रणात टाका.

आता हे तयार झालेलं चवनप्राश एका काचेच्या बरणीत भरून ठेवा आणि रोज एक चमचा खा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.