गर्भारपणात रक्तदाब वाढल्यास असे होतील आरोग्यावर परिणाम

नमिता धुरी

गर्भारपणात रक्तदाब वाढू नये याची काळजी महिलांनी घेणे आवश्यक आहे. रक्तदाब वाढल्यास त्याचा परिणाम आईच्या आणि बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो.

रक्तदाब वाढल्यास महिलांना अस्वस्थता, अंग दुखणे, चक्कर येणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे बाळाची वाढ खुंटते.

नियोजनपूर्व प्रसूती

गर्भावस्थेच्या विसाव्या आठवड्याच्या आधी आईचा रक्तदाब १४०/९ mm/hg पर्यंत पोहोचल्यास हे धोकादायक ठरू शकते. अशा वेळी नियोजनपूर्व प्रसूती होऊ शकते.

सिझेरियन प्रसूती

रक्तदाब वाढल्यास आईचे शरीर साधारण प्रसूतीसाठी तयार नसते. त्यामुळे सिझेरियन करावे लागते.

मस्तिष्काला हानी

आईचा रक्तदाब वाढल्यास बाळाच्या मस्तिष्काला हानी पोहोचू शकते.

प्रिकलॅम्पशिया

विसाव्या आठवड्यानंतर रक्तदाब वाढला तर या स्थितीला प्रिकलॅम्पशिया म्हणतात. यामुळे बाळाच्या मूत्रपिंड आणि यकृतावर परिणाम होऊ शकतो.

कमी वजन

आईचा रक्तदाब वाढल्यास जन्माच्या वेळी बाळाचे वजन गरजेपेक्षा कमी असू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.