सुती कपड्यांची अशी घ्या काळजी... चमक राहील टिकून

नमिता धुरी

सुती कपड्यांवर डाग लागले तर ते काढण्यासाठी कठोर डिटर्जंटऐवजी सौम्य डिटर्जंटचा वापर करा.

सुती कपड्यांना तीव्र उन्हाऐवजी कोवळ्या उन्हात सुकवल्यास त्यांची चमक टिकून राहील.

लोखंडाच्या तारांवर सुती कपडे वाळवायला घातल्यास त्यांना गंज लागू शकतो. त्यामुळे लोखंडी तारा किंवा खांबांवर कपडे वाळत घालू नका.

कपड्यांना इस्री करत असताना हलकेसे पाणी शिंपडा.

सुती कापड झाडापासून तयार झालेले असते. त्यामुळे बराच काळ कपडे कपाटात बंद ठेवल्याने ते पिवळे पडतात, त्यांना आंबट वास येतो किंवा चाचडासारखे कीटक त्यावर येतात. त्यामुळे कपड्यांमध्ये नेप्थलीन बॉल ठेवा.

सुती कपडे वॉशिंग मशीनमध्ये लावू नका. असे केल्यास त्यांच्यावर कमी चुण्या पडतील.

सुती कपडे गरम किंवा कोमट पाण्याने धुतल्यास त्यांचा रंग फिका पडतो. त्यामुळे कपडे थंड पाण्यानेच धुवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.