Janhvi Kapoor : निळ्याशार पाण्यात जान्हवीचा Hot अंदाज

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आजकाल तिची बहीण खुशी कपूरसोबत (Khushi Kapoor) मजेशीर फील्ड ट्रिपचा आनंद घेत आहे.

जान्हवीनं या ट्रीपचे सुंदर फोटो नुकतेच शेअर केले आहेत. तर, तिचा हॉट स्टाइल अंदाज चाहत्यांना वेड लावत आहे.

बिकिनी घातलेला हा फोटो जान्हवीनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय आणि तिनं त्याला 'लुंगी डान्स' असं कॅप्शनही दिलंय. यादरम्यान तिचा लूक इतका हॉट होता की, तिची मावशी महीप कपूरही कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही.

रात्रीच्या निळ्याशार पाण्यात पोहोण्यासाठी जान्हवीनं फ्लोरल प्रिंट टू पीस वेअर घातला होता, ज्याचा बेस कलर काळा होता.

ही स्ट्रिंग पॅटर्न असलेली बिकिनी जान्हवी कपूरनं प्रसिद्ध टू पीस डिझायनर शिवान आणि नरेश यांच्या कलेक्शनमधून घेतलीय.

या काळ्या आणि लाल रंगाच्या बिकिनीमध्ये जान्हवी अप्रतिम दिसत आहे, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor