उन्हाळ्याच्या दिवसांत थंडावा देणाऱ्या आइस्क्रीमचा प्रवेश भारतात कसा झाला माहितीये का ?

नमिता धुरी

इतिहासकारांचे म्हणणे आहे की, ख्रिस्तपूर्व ३ हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये प्रथम आइस्क्रीम तयार करण्यात आले.

मार्को पोलो हा इटालियन व्यापारी साल १२५४ ते १३२४ या काळात चीनमध्ये होता. या काळात चीनमध्ये शिकलेली आइस्क्रीमची पाककृती त्याने इटलीमध्ये नेली असे मानले जाते.

इटलीतून आइस्क्रीम फ्रान्स आणि अमेरिकेत पोहोचले. १७व्या शतकात ते इंग्लंडमध्ये पोहोचले.

इंग्लंडचा तत्कालीन राजा 'चार्ल्स १'ने आइस्क्रीमची पाककृती गुप्त ठेवण्याची सूचना आपल्या शाही आचाऱ्याला दिली होती.

मुघलांच्या माध्यमातून आइस्क्रीम दक्षिण आशियात पोहोचले.

त्यानंतर दिल्लीच्या शाही दरबारात आइस्क्रीम हे फळांच्या रसाप्रमाणे सादर केले जायचे.

काही इतिहासकार असे सांगतात की, ख्रिस्तपूर्व ५०० वर्षांपूर्वी इराणमधील अचमेनिद साम्राज्यामध्ये आइस्क्रीमचा उल्लेख सर्वप्रथम आढळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.