Web Stories : हॉट काजल अग्रवालचा जलवा अजूनही कायम!

सकाळ वृत्तसेवा

2004 मध्ये 'क्‍यों हो गया ना' या हिंदी चित्रपटातून करिअरला सुरवात केलेली काजल अग्रवाल (Kajal Agarwal) 'हो गया ना' या चित्रपटानंतरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली नाही.

काजल अग्रवाल | Sakal

पण बॉलिवूडमध्ये चालत नाहीत त्या अभिनेत्री टॉलिवूडमध्ये अक्षरश: यशोशिखर गाठतात, तसाच प्रकार मुंबईतील पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या काजल अग्रवालबाबतही घडला.

काजल अग्रवाल | Sakal

2007 मध्ये 'लक्ष्मी कल्याणम' या तेलुगु चित्रपटाने काजल अग्रवालला तारले अन्‌ ती टॉलिवूडमध्ये नुसती स्थिरस्थावरच झाली नाही तर तिचे एकामागून एक चित्रपट झळकू लागले.

काजल अग्रवाल | Sakal

मेगास्टार चिरंजीवीचा मुलगा रामचरण तेजाबरोबर प्रमुख भूमिकेत असलेल्या काजल अग्रवालचा चित्रपट 'मगधीरा'ने बॉक्‍स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक गल्ला जमवला अन्‌ काजललाही यशोशिखरावर बसवले.

काजल अग्रवाल | Sakal

तेलुगुतील आघाडीच्या नायकांबरोबर यशस्वी झाल्यानंतर तब्बल सात वर्षांनी म्हणजे 2010 मध्ये काजलने अजय देवगणसोबत 'सिंघम' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.

काजल अग्रवाल | Sakal

6 ऑक्‍टोबर 2020 रोजी उद्योजक गौतम किचलूसोबत काजल विवाहबद्ध झाली. लग्नानंतरही काजल सोशल मीडियावर ऍक्‍टिव्ह आहे.

काजल अग्रवाल | Sakal

काजलच्या फॅन्स फॉलोअरची संख्या मोठी असून तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटो व व्हिडिओंना मोठ्या लाइक्‍स मिळत असतात.

काजल अग्रवाल | Sakal

इन्स्टाग्रामवरील फोटो व व्हिडिओंमध्ये काजल आजही तिच्या नेहमीच्या फॅशनेबल लूकमध्ये दिसून येते व तिचे फॅन्स तिचे अपडेट्‌स फोटो व व्हिडिओज पाहून घायाळ होत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काजल अग्रवाल | Sakal