हॉट कतरिनाच्या मिठीत शर्टलेस विकी; पाहून इंटरनेट तापलं...

प्रणाली मोरे

अभिनेत्री कतरिन कैफनं सोशल मीडियावर एक असा फोटो शेअर केला आहे ज्यानं तिचे चाहते भलतेच खूश झालेले दिसून येत आहेत.

sakal

कतरिनानं आपला पती विकी कौशलसोबतचा एक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी आपल्या आवडत्या कपलची जोरदार प्रशंसा केली आहे. कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांचा जणू धो-धो पाऊस पडत आहे.

Sakal

या फोटोत कतरिना कैफ पांढऱ्या रंगाची मोनोकनी मध्ये तर विकी कौशल शर्टलेस अवतारात दिसत आहे. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारत एक रोमॅंटिक पोझ दिली आहे. या फोटोला शेअर करत कतरिनानं लिहिलं आहे,''मै और मेरा...''

Sakal

कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या या रोमॅंटिक फोटोला पाहून हुमा कुरेशी देखील स्वतःला थांबवू शकली नाही. तिनं लगेचच आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. रकुल प्रीत सिंगने देखील हार्ट इमोजी कमेंट बॉक्समध्ये शेअर केला आहे.

Sakal

कतरिना कैफच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर तर ती 'भूत पोलिस' आणि 'मेरी ख्रिसमस' सारख्या सिनेमांमध्ये दिसणार आहे. 'भूत पोलिस'चं शूटिंग पूर्ण झालं आहे आणि याचवर्षी तो सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Sakal

विकी कौशल देखील सारा अली खान सोबत एका सिनेमात काम करीत आहे. अद्याप या सिनेमाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. विकी आणि कतरिनाचे हॉट फोटो नेहमीच इंटरेनटचा पारा वाढवतात अन् चाहत्यांना खूश करून टाकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal