ऑनलाईन व्यवहार करताना आपण जास्त खबरदारी घ्यायला हवी, तुमच्या एका चुकीमुळे तुमचे बँक खाते क्षणार्धात रिकामे होऊ शकते.
आज आपण ऑनलाईन पेंमेट करताना कोणती काळजी घ्यायला हवी ते जाणून घेणार आहोत.
सायबर फ्रॉड टाळण्यासाठी तुमचा UPI एड्रेस (फोन नंबर, क्यूआर कोड, वीपीए) कोणासोबतही शेयर करु नका. तुमच्या पेमेंट Appसाठी स्ट्रॉंग पासवर्ड सेट करा.
तुम्हाला आलेला कोणत्याही अनोळखी कॉल किंवा मॅसेजवर विश्वास ठेवू नका, तसेच कोणतीही डिजीटल ट्रांजेक्शनसंबंधी माहिती मागली तर ती देऊ नका.
अनोळखी व्यक्तीने इमेल किंवा मेसेजने पाठवलेल्या कुठल्याही लिंकवर क्लिक करु नका.
ऑनलाईन व्यवहारांसाठी एकापेक्षा जास्त Apps वापरु नका, त्यामुळे धोका वाढतो.
मोबाईलमधील पेमेंट Apps अपडेट करत राहा. अपडेटेड App मध्ये तुम्हाल पुर्वीपेक्षा जास्त सुरक्षा मिळते.