जाणून घ्या दररोज ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे

सकाळ डिजिटल टीम

बरेच लोक शौक म्हणून चहा-कॉफी पितात, तर अनेक जणांच्या देनंदिन जीवनात चहा-कॉफी घेतल्याशिवाय कामेच होत नाहीत. दरम्यान कॉफी पिण्याचे शरीराला काही फायदे देखील आहेत.

कॉफीचे अनेक प्रकार आहेत, यापैकी एक प्रकार म्हणजे ब्लॅक कॉफी, चला तर मग ती पिण्याचे फायदे जाणून घेऊयात..

ब्लॅक कॉफी साखर आणि दूध न घालता घेता येते ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

यामध्ये कॅफीन खूप कमी प्रमाणात असते, तसेच यात असलेले अँटीऑक्सिडेंट्स, कॅल्शियम आणि पोटॅशियम शरीराच्या अनक व्यधी दूर करते.

ब्लॅक कऑफी तुमचे मेटाबॉलिझम रेट वाढवते त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

एका रिसर्चनुसार ब्लॅक कॉफी पिणे अल्जायमर सारख्या आजारांचा धोका कमी करते.

मधुमेह असलेल्यांसाठी ब्लॅक कॉफी फायदेशीर ठरते, यामुळे रुग्णांच्या शरीरात इन्सुलिम वाढण्यास मदत होते आणि शुगर लेव्हल कंट्रोल होते.

ब्लॅक कॉफीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडेंट्समुळे लीवर संबंधीत आजार दूर होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

know health benefits of drinking black coffee daily