घरी बसून करा तुमचा PF ट्रान्सफर

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्ही काम करत असलेली कंपनी बदलली असेल तर तुमचा पीफ तुम्हाला नवीन खात्यात ट्रान्सफर करायचे असेल तर त्यासाठी आवश्यक प्रोसेस आज आपण जाणून घेऊयात.

पीफ ट्रान्सफर करण्याची प्रोसेस अगदी सोपी असून तुम्ही घरी बसून हे काम करु शकता त्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

पहिल्यांदा तुमचा UAN आणि पासवर्ड वापरुन EPF खात्यात लॉग इन करा, त्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसेस टॅबमधील ट्रान्सफर रिक्वेस्ट या पर्यायावर क्लिक करा.

तुम्हाला सध्या काम करत असाल त्या आणि पुर्वीच्या कंपनीतील व्हेरिफिकेशनसाठी ट्रान्सफर अर्ज करावा लागेल, आवश्यक ठिकाणी तुमचा युजर आयडी आणि UAN द्या.

तुम्ही 'Get MID' वर क्लिक करुन तुमचा MID देखील जनरेट करु शकता, MID रजिस्टर केल्यार तुम्हाला तुमच्या फोनवर OTP पाठवला जाईल त्यासाठी Get OTP वर क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर 10 दिवसांमध्ये तुम्ही निवडलेल्या कंपनीत PDF फाईलमध्ये ऑनलाईन PF ट्रान्सफर अर्ज सेल्फ अटेस्टेड करुन जमा करा.

कंपनी डिजीटली PF ट्रान्सफर रिक्वेस्ट अप्रुव्ह करते आणि त्यानंतर PF तुमच्या सध्याच्या कंपनीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

know how to transfer pf online