अंड्याचं कवच टाकून देत असाल तर हे नक्की वाचा... असे आहेत कवचाचे फायदे

नमिता धुरी

अंड्याचं कवच पोषक

अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने, जीवनसत्त्वे आणि क्षार असतात. त्यामुळे सुदृढ आरोग्यासाठी अनेकजण आवर्जून अंडे खातात; मात्र अंडे खाताना त्याचा फक्त आतला भाग खाल्ला जातो. कवच टाकून दिले जाते. या कवचातही बरेच पोषक घटक असतात.

केसांची घनता वाढवा

अंड्याचं कवच आणि दही यांचे मिश्रण करा. हे मिश्रण केसांना लावून ४५ मिनिटे ठेवा. त्यानंतर केस शॅम्पूने धुवा. केस कोरडे असल्यास आठवड्यातून एकदा हे मिश्रण केसांना लावा. नियमितपणे लावल्यास केसांची घनता आणि चमक वाढेल.

तेलकट टाळूसाठी

अंड्याचं कवच आणि त्याचा पांढरा भाग यांचे मिश्रण करा. हे मिश्रण जास्त ओले आणि घट्ट होऊ देऊ नका. साधारण २० मिनिटे हे मिश्रण टाळूला लावून ठेवा व त्यानंतर शॅम्पूने केस धुवा.

कोरड्या आणि निर्जीव केसांसाठी

कोरड्या आणि निर्जीव केसांवर उपाय म्हणून अंड्याचे कवच आणि अॅलोवेरा जेल यांचे मिश्रण करा. हे मिश्रण २० मिनिटे केसांवर लावून ठेवा. त्यानंतर केस साध्या पाण्याने धुवा. दुसऱ्या दिवशी केस शॅम्पूने धुवा. हे मिश्रण आठवड्यातून एकदा लावा.

अंड्याचा चुरा

सर्वात आधी अंड्याचे कवच उन्हात सुकत ठेवा. त्यानंतर सुकलेले कवच मिक्सरमध्ये वाटून घ्यावा. हा चुरा तुम्ही बऱ्याच कालावधीसाठी ठेवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.