बचत खाते सुरू करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

सकाळ डिजिटल टीम

बचत खात्यात रक्कम ठेवण्याचे दोन फायदे आहेत एक पैसे सुरक्षित राहातात, तर दुसरा तुम्हाला व्याज देखील मिळतं.

यामुळे तुम्ही किती पैसे कमवत आहात याचा अंदाज राहातो, सोबतच तुम्ही ऑनलाईन बँकिंग, एटिएम, चेकबुक यासारख्या सेवा देखील वापरु शकता.

पहिल्यांदाच बचत खाते उघडताना लोक व्याज दर, किमान बॅलेन्स आणि एफडी दर यांची चौकशी करतात.

पण बचत खात्यासाठी काही सर्व्हिसेस आणि चार्जेस आकारले जाऊ शकतात, त्यामुळे याविशयी माहिती घेणे फायदेशीर ठरत्

बचत खाते सुरु करताना अटी आणि शर्ती व्यवस्थित वाचून घ्या, त्यात काही छुप्या गोष्टी नाहीत ना याची खात्री करून घ्या.

बँक स्टेटमेंटमध्ये तुमच्या व्यवहारांची सगळी माहिती असते त्यामुळे वेळोवेळे ते तपासून पाहात राहा.

बचत खात्याच्या संबंधीत चार्जेसमध्ये सतत बदल होत असतात, त्यामुळे बँकेच्या वेबसाईटवर सतत अपडेट्सची माहिती घेत रहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.