'कुमकुम भाग्य' फेम रुचि सवर्णने 'Maternity' फोटो केले शेअर

अर्चना बनगे

टिव्हीवरील प्रसिध्द मालिका 'कुमकुम भाग्य' फेम रुचि सवर्ण लवकरच आई होणार आहे. तिच्या सोशल अकाऊंटवर मॅटरनिटी शूट केलेल फोटो शेअर केले आहेत. यात तिने पिवळ्या रंगाची साडी घातली आहे. या फोटोमध्ये तिचा पती अंकित मोहन याने ही पिवळा ड्रेस परीधान केला आहे.

पोस्ट शेअर करताना रुचिने लिहले आहे कि, सगळ्यात सुंदर टिम सोबत मला काम करायची संधी मिळाली. मला काम करताना खूप आरामदायक वाटले.

रुचि सवर्ण लवकरच आई होणार आहे. तिच्या सोशल अकाऊंटवर मॅटरनिटी शूट केलेल फोटो शेअर केले आहेत. यात तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.या फोटोमध्ये तिचा पती अंकित मोहन याने कॅज्युअल कपडे घातले आहेत.

सोशल मिडियावर रुचि नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती सतत पोस्ट शेअर करत असते. आता तिने गरोदरपणात वर्कआउट्सच्या पोस्ट शेअर केल्या आहेत.

रुचिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीची सुरूवात सोनी टिव्हि वरील 'प्यार का बंधन' या मालिकेत 2009 मध्ये केली. डेब्यू शोमध्ये तिने राधा हे सपोर्टिंग पात्र साकारले होते. या शोनंतर तिने 'तेरे लिए', 'घर आजा परदेसी', 'तमन्ना' या मिलिकेत काम केले.

- रुचि आणि अंकित हे दोघे २०१५ मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले. यावर्षि गणेश चतुर्थी दरम्यान गर्भधारणेविषयी त्यांनी सांगितले होते.

'कुमकुम भाग्य' या मालिकेत तिने दिशा नावाचे पात्र साकारले होते.

सर्व फोटो-ruchisavarn सोशल अकाऊंटवरून..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.