जान्हवीनं पुनीत बलानासाठी केला रॅम्प वॉक

सकाळ डिजिटल टीम

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) नेहमी तिच्या स्टाईलनं चाहत्यांना वेड लावत असते. अलीकडंच तिनं लॅक्मे फॅशन वीकमध्ये (Lakme Fashion Week) भाग घेतला होता. पुनीत बलानासाठी (Punit Balana) तिनं रॅम्प वॉक केलंय.

घागरा-चोळी परिधान करून जान्हवीनं पुन्हा एकदा पारंपरिक पोशाखात तिच्या स्टाईलनं चाहत्यांना घायाळ केलंय.

जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच तिनं तिच्या चाहत्यांसोबत रॅम्प वॉकचे काही फोटो शेअर केलेत, त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

जान्हवीनं तिचे एकामागून एक असे 8 फोटो शेअर केलेत. या फोटोंत तिनं दोन वेगवेगळे ड्रेस परिधान केले आहेत.

पहिल्या ड्रेसमध्ये ती लाल रंगाच्या घागरा आणि चोळीमध्ये दिसत आहे.

दुसऱ्या फोटोत तिनं फ्लोरल प्रिंटेड लेहेंगा घातलाय, ज्यात ती खूप सुंदर दिसतेय.

सोशल मीडियावर या फोटोंना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor