साउथ लेडी सुपरस्टार 'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टी!

| Sakal

तेलुगु व तमिळ चित्रपटातील लेडी सुपरस्टार अनुष्का शेट्टी 'बाहुबली' चित्रपटामुळे जगभर प्रसिद्ध झाली.

| Sakal

तिने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करून प्रामुख्याने तेलुगु आणि तमिळ चित्रपट उद्योगात फेमस झाली.

| Sakal

चित्रपटसृष्टीतील नंदी अवॉर्डसह तिला तीन फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

| Sakal

अनुष्काने 2005 मध्ये तेलुगु चित्रपट 'सुपर'मधून अभिनय पदार्पण केले अन्‌ या चित्रपटातील भूमिकेमुळे तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

| Sakal

त्याच्या पुढील वर्षी अनुष्काने एस. एस. राजामौली यांच्या 'विक्रमार्कुडू'मध्ये काम केले अन्‌ त्या चित्रपटाला मोठे व्यावसायिक यश मिळाले.

| Sakal

त्यानंतर 'लक्ष्यम' (2007), 'शौर्यम' (2008) आणि "चिंतायाला रवी' (2008) हे देखील बॉक्‍स ऑफिसवर यशस्वी ठरले.

| Sakal

2009 मध्ये अनुष्काने तेलुगु डार्क फॅंटसी चित्रपट 'अरुंधती'मध्ये दुहेरी भूमिका साकारल्या.

| Sakal

'अरुंधती' चित्रपटाची समीक्षकांनी प्रशंसा केली अन्‌ अनुष्काला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा पहिला तेलुगु फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

| Sakal