maharashtra politics : राज्याला आत्तापर्यंत लाभलेले उपमुख्यमंत्री

| Sakal

उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक पद नाही. सर्वाधिक चार वेळा अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले.

| Sakal

राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे होते. 5 मार्च 1978 मध्ये त्यांनी आपला पदभार स्विकारला.

| Sakal

मुख्यंत्री शरद पवार यांच्या काळात सुंदरराव सोळंके यांनी १९७८-८० या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले

| Sakal

रामराव आदिक हे मराठी राजकारणी आणि उल्लेखनीय वकील होते. ते १९८४ ते १९८७ पर्यंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते.

| Sakal

गोपीनाथ मुंडे १४ मार्च १९९५ ते १९९९ या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री होते.

| Sakal

छगन भुजबळ यांनी दोनदा उपमुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. एप्रिल २००२ ते २३ डिसेंबर २००३ या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते.

| Sakal

विजयसिंह मोहिते-पाटील हे सोलापूर जिल्ह्यामधील एक वरिष्ठ राजकारणी असून त्यांनी २००३ ते २००४ दरम्यान उपमुख्यमंत्री पद सांभाळले आहे.

| Sakal

आर. आर. पाटील १ नोव्हेंबर २००४ ते १ डिसेंबर २००८ दरम्यान उपमुख्यमंत्री पद सांभाळले.

| Sakal

छगन भुजबळ यांनी २००८ मध्ये पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतला होता.

| Sakal

सर्वाधिक चार वेळा अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. 2010 ते 2012 दरम्यान पहिल्यांदा अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्याच काळात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपद सांभाळले. त्यानंतर केवळ ७२ तास अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपद सांभाळले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात अजित पवारांनी ३० डिसेंबरला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे पद त्यांनी केवळ अडीच वर्ष सांभाळले.

| Sakal

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारत ३० जुनला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

| Sakal