'१०० रुपयावर दिवस काढलेयत,कसं विसरु'- 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरे

प्रणाली मोरे

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा(Maharashtrachi Hasyajatra) या माध्यमातून अभिनेता गौरव मोरेला(Gaurav More) आज घराघरातील प्रेक्षक ओळखतात अन् त्यांचे प्रेम देखील त्याला मिळालं आहे. गौरव मोरे सध्या चर्चेत आहे ते महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलिप वळसे-पाटील यांच्या हस्ते भीमरत्न या पुरस्कारानं गौरविल्यामुळे.

गौरवनं या पुरस्काराविषयी आभार व्यक्त करताना म्हटलं आहे की, '''हा पुरस्कार समाजातील लोकांसाठी उपयुक्त काम केल्याच्या निमित्तानं,त्यांचं मनोरंजन केल्या निमित्तानं प्राप्त होत असतो. आणि मी त्याचा मानकरी ठरलो याचा मला अभिमान आहे''.

Esakal

मध्यमवर्गीय घरातून आलेल्या गौरव मोरेनं मनोरंजन क्षेत्रात येण्यासाठी खूप स्ट्रगल केलंय. ''विनोदी अभिनेता बनायचं हे निश्चित होतं,त्यामुळे उपाशी राहिलो पण मेहनत करणं सुरू ठेवलं आणि म्हणूनच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम मिळाला असं गौरव म्हणाला''.

Esakal

''ऑडिशनसाठी जायला खिशात पैसे नसायचे, तासनतास चालत स्टुडिओ गाठायचो. फोन गरजेचा होता पण तो देखील नसल्यानं बरेच कष्ट पडलेयत. १०० रुपयांवर अनेक दिवस काढायचो'' हा आपला संघर्ष गौरव मोरेनं पुरस्कार स्विकारल्यानंतर सर्वांसमोर मांडला.

Esakal

''अनेकजण आपला भूतकाळ विसरतात पण मला तो लक्षात ठेवायला आवडेल. मी झोपडपट्टीत रहायचो,अन् तिथूनच मी उंच भरारी घ्यायचं स्वप्न पाहिलं हे माझ्या कायम स्मरणात मला ठेवायचं आहे''.

Esakal

गौरव मोरेनं 'संजू' सिनेमातही काम केलं आहे. परेश रावल यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तेव्हा खूप शिकता आलं असं देखील त्यानं नमूद केलं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal