आद्य समाज सुधारक, कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे महात्मा बसवेश्वर

सकाळ डिजिटल टीम

Basweshwar Jayanti 2022 : लिंगायत (Lingayat ) धर्माचे धर्मगुरु (Dharmaguru), विश्वगुरु महात्मा अर्थात बसवेश्वर (Basweshwar ​) यांचा जन्मदिन वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला (Akshay Tritiya) झाला अशी धारणा असल्याने हा दिवस बसवेश्वर जयंती (Basweshwar Jayanti) म्हणून साजरा केला जातो.

कर्नाटकाच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहासात संत महात्मा बसवेश्वरांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलंय.

आद्य समाज सुधारक तसेच कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे आणि वीरशैव धर्माचे पुनरूज्जीवन करणारी थोर विभुती म्हणून संत बसवेश्वर यांच्याकडं पाहिलं जातं.

वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया दिनी इ.स. ११०५ मध्ये बसवेश्वर यांचा जन्म झाला. धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्मय, राजकारण अशा क्षेत्रांतील त्यांचं कार्य क्रांतिकारक स्वरूपाचं आहे.

भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष म्हणून संत बसवेश्वर यांच्याकडं पाहिलं जातं. महाराष्ट्रातील सोलापूर येथील मंगळवेढा इथं त्यांनी तब्बल ३१ वर्षे वास्तव्य केलं होतं.

बसवेश्वरांनी मंगळवेढ्यातूनच लिंगायत धर्माची स्थापना केली, असं सांगितलं जातं. धर्मप्रसारासाठी श्रवणबेळगोळा, बसवकल्याण या कर्नाटकातील प्रदेशांत आले. लिंगायत समाज बसवेश्वरांना शिववाहन नंदीचा अवतार मानतात.

बसवेश्वरांनी वेद, उपनिषदे, षड्दर्शने, पुराणांचा सखोल अभ्यास करून उच्चकोटीचे ज्ञान प्राप्त केले. संस्कृत, पाली, तामीळ या भाषांवरही प्रभुत्व मिळविले.

आपल्या ज्ञानप्राप्तीतून त्यांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले. 'कायकवे कैलास' हा विचार त्यांनी मांडला. याचा अर्थ केवळ कष्टानेच स्वर्गाची म्हणजेच शिवाची, मोक्षाची प्राप्ती होते, असं त्यांचं स्पष्ट मत होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Basweshwar Jayanti 2022