घरी बसल्या बनवा पासपोर्ट; असा करा ऑनलाइन अर्ज

सकाळ डिजिटल टीम

पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करणे सोपे झाले आहे. मात्र, ऑनलाइन अर्ज करूनही तुम्हाला पासपोर्ट कार्यालयात जावे लागणार आहे. मात्र, एजंटची गरज पडणार नाही.

पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पासपोर्ट सेवेची अधिकृत वेबसाइट https://www.passportindia.gov.in/ वर जा.

प्रथम स्वतःची नोंदणी करा. यानंतर तुमचे नाव, जवळचे पासपोर्ट ऑफिस, मोबाईल नंबर सारखी तुमची माहिती भरा.

त्यानंतर पासपोर्ट सेवा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Continue या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर Apply for Fresh Passport/Reissue of Passport या पर्यायावर क्लिक करा.

Click Here To Fill या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Next Page आणि all वर क्लिक करा

यानंतर Submit या पर्यायावर क्लिक करा. नंतर Saved/Submitted पहा व Applications वर जा.

ऑनलाइन पेमेंट पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्ही जवळच्या पासपोर्ट कार्यालयाच्या अपॉइंटमेंटमध्ये प्रवेश कराल.

त्यानंतर पे आणि बुक अपॉइंटमेंट निवडा आणि अर्जाची पावती प्रिंट करा.

अपॉइंटमेंटच्या दिवशी पासपोर्ट ऑफिसमध्ये पोहोचा आणि नंतर पोलिस व्हेरिफिकेशन होईल.

त्यानंतर पासपोर्ट स्पीड पोस्टवरून घरी येईल.

पासपोर्ट घरी आला नाही तर पासपोर्ट कार्यालयात जाऊनही घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.