फॅशन, बोल्डनेस व सुंदरतेच्या बाबतीत आजही मलाईका अरोराचे (Malaika Arora) नाव घेतले जाते; मात्र केवळ दोनच तेलुगु चित्रपटांमध्ये झळकलेली मालविका शर्मा (Malvika Sharma) ही मलाईकाच्या वाटेवर दिसून येतेय.
मुंबईत जन्मलेल्या मालविका शर्माने कॉलेज गर्ल असतानाच मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरला सुरुवात केली.
ती 2017 मध्ये हिमालय, डेटॉल व मलबार आदी कंपन्यांच्या व्यावसायिक जाहिरातींमध्ये दिसून आली.
याशिवाय मालविका कायद्याचे शिक्षण घेत असून, गुन्हा आणि गुन्हेगार या विषयावर ती फोकस करत आहे.
मात्र, 2018 मध्ये टॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रवी तेजाचा तेलुगु चित्रपट 'नेला टिकेट'मधून मालविकाने टालिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री घेतली.
त्यानंतर 2021 मध्ये रिलीज झालेल्या 'रेड' या तेलुगु स्टार राम पोथिनेनीच्या चित्रपटात तिने भूमिका साकारली.
या चित्रपटांतील तिच्या अभिनयापेक्षाही तिचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना आवडला. केवळ या दोन चित्रपटांमुळे मालविका टॉलिवूडमध्ये हिट झाली आहे.
मालविका सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असून, तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे फोटोज व व्हिडिओज शेअर करत असते.
सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असून तिच्या बोल्ड व ग्लॅमरस लूकचे चाहते दिवाने आहेत.