मराठी टेलिव्हिजन मनोरंजन क्षेत्रातील प्रख्यात अभिनेत्री रुचिरा जाधव ही नेहमीच तिच्या लुकसाठी चर्चेत असते.
आताही ती तिच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
रुचिराच्या त्या फोटोंना तिच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्सही दिल्या आहेत.
आता रुचिरानं तिचा एक बोल्ड लूक तिच्या चाहत्यांसाठी शेयर केला असून त्या फोटोला कारणं असं की, 'समर' असं म्हटलं आहे.
रुचिरानं आपल्या अभियनयानं कमी कालावधीत मोठी लोकप्रियता मिळवली आहे. तिनं माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये केलेली भूमिका प्रेक्षकांना आवडली.
याशिवाय तिनं बेदुणे दहा, माझे पती सौभाग्यवती, प्रेम हे, तुज्यावाचून करमेना या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.
रुचिरा ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या अदांसाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.