गजरा रे... गजरा रे...

भक्ती सोमण-गोखले

लग्न ठरल्यावर सगळ्यात आधी शॉपिंग होते ते साड्यांचे. साड्यांचे रंग कोणते आहेत त्यानुसार मेकअप ठरविला जातो. तसेच त्याला सुट होणारी हेअरस्टाईल केली जाते.

गजरा हा मुलींचा विकपॉईंट असतो. हा गजरा माळून अनेक हेअरस्टाईल्स करता येऊ शकतात.

मुलींना लग्नात दिसायला सोबर पण फॅन्सी दिसेल अशा हेअरस्टाईल्स करण्याकडे कल असतो. त्यासाठी आता गजरा घालून हेअरस्टाईल करण्याकडे मुली पसंती देत आहेत.

यासाठी तुम्हाला वेणीत अशाप्रकारे गुलाबी आणि पांढऱ्या फुलांचे कॉम्बिनेशन करता येईल. अर्थातच ते तुमच्या ड्रेसला मॅचिग झालेले असले पाहिजे.

केस अशाप्रकारे सोडून तुम्ही केसांच्या मध्ये अशी फुलं सेट करू शकता. व्हाईट किंवा निळ्या रंगाच्या शरारावरती ही फुले सुंदर दिसतील.

कांजीवरम साडीवर वेणी घालून त्यावर आवडीच्या फुलांचा गजरा माळता येईल. तुोम्ही गोल वेणीवरही अशाप्रकारे गजरा माळू शकता.

गजरे आणि विविध फुलांच्या अशा एकसोएक हेअरस्टाईल्स तुम्ही तुमच्या लग्नासाठी करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.