तापामुळे किंवा शरीरात उष्णता वाढल्यामुळे ओठावर किेंवा नाकपुडीच्या खाली जर उठतो त्यावर जिरे पाण्यात बारीक वाटून तयार केलेला लेप लावावा.
गांधीलमाशी, मधमाशी वैगरे कोणताही कीटक चावला असता जिरे पाण्यात वाटून तयोर केलेला लेु दंशस्थानी लावल्याने बरे वाटणार.
चेहऱ्यावर तेलकटपणा जाणवत असेल तर चंदन व हळकूंड उगारुन तयार केलेल्या लेपात जिऱ्याची पूड मिसळून चेहऱ्यावर लावावा.
स्त्रियांच्या अंगावरुन पांढरे किंवा पाण्यासारखे जात असेल तर जिऱ्याची पूड व खडीसाखर मिसळून तयार केलेले चूर्ण तांदळाच्या धुवणाबरोबर घेण्याचा उपयोग होतो.
रोज दुपारच्या जेवणानंतर ताकामध्ये पाव चमचा जिऱ्याची पूड, दोन चिमूट सैंधव मीठ टाकून पिण्या पिण्याने पचन व्यवस्थित होतं