मीठ पाचक असल्याने रोज जेवणाआधी आल्याचा छोटा तुकडा मीठ लावून खाल्ला तर त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होण्यास मदत मिळते.
पोटात वायू झाला असेल तर सुंठीचा तुकडा थोडा भाजून घेऊन, मीठ लावून खाल्याने बरे वाटेल.
लहान मुलांची छाती कफाने भरते अशा वेळी मिठाच्या पुरचुंडीने शेकण्याने कफ मोकळा होऊन पडतो
बाळ जन्माला आले असता त्याचा अंगावर चिकटपणा असतो हा चिकटपणा सहजासहजी निघून जाण्यासाठी तूपामध्ये बारीक केलेले सैंधव मीठ मिसळून चोळावे
वातामुळे शरीरावर कुठेही दुखत असेल तर मिठाची पुरचुंडीने शेकण्याने बरे वाटते.