कडक फिगर दाखवत हरनाझचा ट्रोलर्सवर पलटवार...

प्रणाली मोरे

मिस युनिव्हर्स २०२१ चा खिताब जिंकल्यानंतर हरनाझ संधू हे नाव सर्व जगभरात प्रसिद्ध झालं. हरनाझच्या माथ्यावर जेव्हा मिस युनिव्हर्सचा ताज चढला तेव्हा सबंध भारताच्या आनंदाला पारावर राहिला नाही.

Esakal

सौंदर्यासोबतच हरनाझच्या फिटनेसवरही अनेकजण फिदा झाले होते.पण मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकल्यानंतर केवळ ३ महिन्यात हरनाझचा लूक एकदम बदलला.

Esakal

हरनाझचं वजन अधिकच वाढलं होतं. त्यावेळी हरनाझला खूप ट्रोल केलं गेलं,तिला बॉडी शेमिंगचा त्रासही सहन करावा लागला.

Esakal

हरनाझने मात्र आपला आत्मविश्वास तसूभरही ढळू दिला नाही. तिनं आपल्या वजनावर नियंत्रण मिळवत ट्रोलर्सवर चांगलाच पलटवार केला आहे. फॅट ते फिटचा प्रवास तिनं असा पटकन केला आहे.

Esakal

हरनाझनं आपल्या ग्लॅमरस अंदाजातले आणि कडक फिगर दाखवणारे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते पाहिल्यावर ती अनेकांसाठी प्रेरणा ठरेल हे निश्चित.

Esakal

हरनाझचे नवे फोटो पाहून जो-तो तिची प्रशंसा करत सुटला आहे. हरनाझ पुन्हा एकदा जरा जास्तच फिट दिसत आहे. बॉडी हगिंग ड्रेसेसमध्ये हरनाझ आपल्या टोंड फिगरला फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal