कोण आहे मिथिला पालकरचा गोल्डन बॉय?

| Sakal

मिथिला पालकर(Mithila Palkar) म्हणजे सध्याच्या काळातली 'वेब क्वीन' किंवा 'सिरीज क्वीन' म्हणूया नं. या मराठमोळ्या मुलीनं वेबसिरीज अन् हिंदी इंडस्ट्रीत खूप कमी वेळात आपल्या सहज अभिनयानं नाव कमावलं आहे.

| Sakal

मिथिला सध्या अमेरिकेच्या टूरवर आहे. तिथे तिने आपला गोल्डन बॉय म्हणजे लाडक्या डॉगी सोबत छान फोटोशूट करत ते इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Sakal

मिथिलानं हे फोटोशूट अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये असलेल्या गोल्ड गेट ब्रिजजवळ केलं आहे.

| Sakal

हे फोटो शेअर करत तिनं कॅप्शन दिलं आहे की,'गोल्डन गेट विथ माय गोल्डन बॉय!' मिथिला नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. आणि असे हटके फोटो विथ हटके कॅप्शन देऊन शेअर करत असते. आता आपणही फसलोच की,मिथिलाचा गोल्डन बॉय कोण बरं हा विचार करताना...

| Sakal

'लिटिल थिंग्ज' या वेबसिरीजमधून मिथिलानं साकारलेल्या भूमिकेनं तिच्या फॅन फॉलॉइंगमध्ये अधिक भर पाडली. या सिरीजमध्ये लिव्ह इन रिलेशनशीपवर खूप मोकळेपणानं भाष्य करण्यात आलं आहे.

| Sakal