Lookback 2021 : कसोटीत आर अश्विन किंग; पाहा टॉप 5 गोलंदाज

Kiran Mahanavar

आता 2021 हे वर्ष सरणार आहे. या वर्षी क्रिकेटविश्वाशी अनेक कडू - गोड आठवणी जोडल्या गेल्या आहेत, याचबरोबर अनेक विक्रमही क्रिकेट मैदानात झाले.

ravindra jadeja | sakal

सरत्या वर्षात अनेक गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे. 2021 मधील अशाच काही कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारे गोलंदाज आपण पाहणार आहोत.

sakal

हे वर्ष भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनच्या नावावर आहे. 2021 मध्ये कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विनचे नाव आघाडीवर आहे.

sakal

अश्विनने यावर्षी भारतासाठी 8 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले. त्याने 2.31 इकॉनॉमीने तब्बल 52 बळी घेतले आहेत. आर. अश्विन सध्या आफ्रिका दौऱ्यावर आहे.

sakal

या यादीत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. शाहीन आफ्रिदीने यावर्षी आपल्या गोलंदाजीने जगाला प्रभावित केले आहे.

Shaheen Afridi | sakal

शाहीन आफ्रिदीने यावर्षी 9 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने आतापर्यंत 47 विकेट्स घेतल्या आहेत.

Shaheen Afridi | sakal

पाकिस्तानचा गोलंदाज हसन अलीनेही खूप प्रभावित केले आहे. या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने यावर्षी 8 कसोटी सामन्यात 41 विकेट घेतल्या आहेत.

Hasan Ali | sakal

अक्षर पटेलनेही मिळालेल्या मर्यादित संधीचा पुरेपूर फायदा उचलला. त्याने आपल्या गोलंदाजीने खूप प्रभावित केले. अक्षरने यावर्षी फक्त 5 कसोटी सामने खेळले असून 36 विकेट्स घेतल्या आहेत.

Axar Patel | sakal

अक्षर पटेलच्या कसोटी कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, पटेलने आतापर्यंत केवळ 5 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले आहेत. 2021 मध्येच त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले.

Axar Patel | sakal

या यादीत इंग्लंडचा गोलंदाज ऑली रॉबिन्सनचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे. रॉबिन्सनने या वर्षी 8 कसोटी सामन्यांमध्ये 35 बळी घेतले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ollie Robinson | sakal