Mukesh Ambani: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा आज वाढदिवस

| Sakal

मुकेश अंबानी यांचा जन्म १९ एप्रिल १९५७ रोजी यमनच्या एडन येथे झाला. भारतीय अब्जाधीश बिझिनेस मॅन, एक उद्योगपती, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वात मोठे भागीधारक अशी त्यांची ख्याती आहे.

| Sakal

त्यांनी 1985 मध्ये नीता अंबानीशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले, आकाश आणि अनंत आणि एक मुलगी, ईशा, आहे.

| Sakal

फोर्ब्सच्या मते, 12 फेब्रुवारी 2022 पर्यंत, US$90.3 अब्ज संपत्तीसह मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे आणि जगातील 10वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.

| Sakal

2008 मध्ये आयपीएल क्रिकेट संघ मुंबई इंडियन्स $111.9 दशलक्षमध्ये खरेदी केल्यानंतर अंबानी यांना “जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघाचे मालक” अशी उपाधी देण्यात आली होती.

| Sakal

ते मुंबईतील अँटिलिया या खाजगी 27 मजली इमारतीत राहतात, ज्याची किंमत US$1 अब्ज होती आणि ती बांधली गेली त्यावेळी जगातील सर्वात महागडे खाजगी निवासस्थान म्हणून गणल्या गेले होते

| Sakal

त्यांच्या जगभरात ५०० पेक्षा जास्त कंपनी आहेत, आणि भारताच्या बाजारपेठेत त्यांच्या कंपन्या खूप मूल्यवान आहेत.

| Sakal