नवनीत राणांचा तो फोटो व्हायरल

| Sakal

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अपक्ष खासदार नवनीत राणाही संसदेत पोहोचल्या. त्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

| Sakal

नवनीत राणा यांनी पुष्पा सिनेमातील पोझ दिली.

| Sakal

द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एनडीए सदस्यांसह संसद भवनात महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली.

| Sakal

द्रौपदी मुर्मू उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संसद भवनात पोहोचल्या तेव्हा संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी त्यांचे स्वागत केले.

| Sakal

एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर मान्यवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संसद भवनात पोहोचले.

| Sakal

द्रौपदी मुर्मू यांनी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

| Sakal

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर द्रौपदी मुर्मू संसद भवनातून बाहेर पडल्या. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते.

| Sakal