Photos: नोबेल विजेती मलाला अडकली विवाहबंधनात

सुस्मिता वडतिले

नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसुफजई हिने बर्मिंगहममध्ये लग्न केलं. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.

मलालाने सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. मलालाने असर याच्याशी लग्न केलं आहे.

मलालाने ट्विटरवर म्हटलं की, आज माझ्या आय़ुष्यातील खास दिवस आहे. असर आणि मी लग्न केलं.

असर मलिक हा पीसीबी क्रिकेट बोर्डाचा जनरल मॅनेजर म्हणून काम पाहत आहे. मे २०२० मध्ये त्यानं क्रिकेट बोर्ड जॉइन केल्याचं त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये म्हटलं आहे.

तसंच त्याआधी मलिकने पाकिस्तान सुपर लीगची फ्रँचाइजी मुलतान सुलतानचा ऑपरेशनल मॅनेजर म्हणूनही जबाबदारी पार पाडली होती.

याशिवाय तो खेळाडूंसाठी व्यवस्थापन एजन्सीसुद्धा चालवतो. लाहोर विद्यापीठातून त्याने अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रातून पदवी मिळवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.