ओला इलेक्ट्रिक स्कूटर, एका चार्जवर धावेल 181 किमी

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही तुमच्या खिशाला परवडणारे इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असाल तर ओला इलेक्ट्रिक स्कूटर हा एक चांगला पर्याय ठरु शकतो.

अलीकडेच ओला ने त्यांटी इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 लॉंच केली आहे, या स्कूटरचे दोन व्हेरियंट आहेत, S1 आणि S1 Pro.

या स्कूटरमध्ये कंपनी सेगमेंटमधील बेस्ट फीचर्स दिले आहेत.

कंपनी या स्कूटरमध्ये आर्टीफिशियल साऊंड सिस्टीम देते ज्यामुळे तुम्ही मुडनुसार स्कूटरचा आवाज बदलू शकता.

4G कनेक्टीव्हिटी सिस्टीम यात तुम्हाला देण्यात येते ज्यामुळे तुम्ही इंटरनेटशी कनेक्टेड राहाता, सोबतच सात इंचाची टच स्क्रीन डिस्प्ले आणि स्पीकर देखील मिळतील.

स्कूटरमध्ये तुम्हाला 3.9kWh क्षमतेची बॅटरी दिली असून याची इलेक्ट्रिक मोटार 8.5 kWh पीक पावर जनरेट करते.

ही बॅटरी 750 W क्षमतेच्या पोर्टेबल चार्जरसह येते आणि सुमारे सहा तासांत पूर्णपणे चार्ज होते

कंपनीचा दावा आहे की ही इसेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 181 किमी ड्रायव्हिंग रेंज देते.

Ola S1 ची किंमत 85,099 रुपये आणि Ola S1 Pro ची किंमत 1.10 इतकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ola electric scooter s1 and s1 pro with 181km range see features price