मालदिव्हजला जायचंय, कमी बजेटमध्ये असे फिरा

भक्ती सोमण-गोखले

दररोज कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटींचे मालदीवच्या सुट्टीतील फोटो आपल्याला पाहायला मिळतात. ते फोटो पाहून तुम्हालाही मालदीवला जायची इच्छा होत असेल.

परदेशात सहलीला जायचं असेल तर अव्वाच्या सव्वा खर्च येतो. अशावेळी इथे कसं जायचं असा प्रश्न पडतो. तुम्ही कमी बजेट असले तरी मालदिव ट्रीप प्लॅन करू शकता.

तुम्ही जर मालदिवला जाण्याचा प्लॅन करत असाल तर, त्यासाठी काही महिने आधीच तयारी करा. बजेट सेट करा आणि त्यासाठी बचत करत रहा.

तुम्हाला सगळ्यात आधी फ्लाइट बुक करायचे आहे, तुम्ही आगाऊ तिकीट बुक केल्यास तुमचा खर्च बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतो. तुमची तिकिटे किमान 3-4 महिने अगोदर बुक करा.

मालदिवमध्ये तुम्हाला खासगी बेटावर लक्झरी सुविधा मिळतील. पण ते रिसॉर्ट्स खूप महाग आहेत. तुमची बजेट ट्रीप असल्याने खाजगी बेटांपेक्षा सार्वजनिक बेटांवर हॉटेल बुक करा.

मालदीवमध्ये तुम्ही जेट स्कीइंग, फ्लायबोर्डिंग, बनाना बोटिंग, काईट सर्फिंग, डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग करू शकता. 9000 ते 70 हजार रुपयांपर्यंत असे खेळ उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार वॉटर अ‍ॅक्टिव्हिटी निवडा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.