अभिनेत्री सोनम कपूर तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे.
सोनम सध्या भारतापासून दूर असली तरी ती तिच्याबद्दलचे प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.
लवकरच आई होणारी सोनम कपूर सध्या तिचा प्रेग्नेंसीचा काळ एन्जॉय करत आहे.
सोनम इंस्टाग्रामवर बेबी बम्पं फ्लॉन्ट करतानाचे फोटो शेअर करत असते.
नुकतचं तिनं नवे फोटोशुट केलं असून डिझायनर अबु जानी आणि संदीप खोसला यांच्या स्टायलिश ड्रेसमध्ये बेबी बम्पं फ्लॉन्ट करताना दिसली.
मातृत्वाच्या उंबरठ्यावर आणि माझ्या वाढदिवसाच्या उंबरठ्यावर असताना मला हवे तसे मी कपडे परिधान करण्याचा मी आनंद घेत आहे. अशी भावना तिनं कॅप्शनमध्ये व्यक्त केली आहे.
गर्भवती आणि शक्तिशाली, बोल्ड आणि सुंदर... असेही तिनं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
सोनम कपूरच्या बेबी बंपमधील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते.
सोनम कपूर शेवटची वीरे दी वेडिंगमध्ये झळकली होती.
सोनमनं ती प्रेग्नंट असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती.